Welcome to Police News Network 24x7   Click to listen highlighted text! Welcome to Police News Network 24x7
Uncategorized
Trending

कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा (दक्षिण रायगड) उत्साहात संपन्न

  • माणगाव : महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षण संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कारांतर्गत कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ (दक्षिण रायगड विभाग) अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आ श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी रायगडचे धडाडीचे पालकमंत्री श्री.भरतशेठ गोगावले आणि माजी राज्यसभा खा श्री. धैर्यशील पाटील यांच्या शुभहस्ते शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला माणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विजयराज खुळे, सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या ट्रस्टी गीताताई पालरेचा, शिक्षक परिषदेचे संपर्क प्रमुख श्री. विजय देवकर आणि दक्षिण रायगडचे संपर्क प्रमुख श्री. राजेंद्र पवार, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे सचिव सल्लागार रवींद्र पालवे, विजय गुळवणी, महेंद्र शिर्के, बाबुराव कांबळे, संजय गायकवाड, हनीफ शेख, तोफीक धनसे, दत्तात्रय उत्तेकर, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे दक्षिण रायगड अध्यक्ष श्री. राजकुमार मुंढे, उपाध्यक्ष शहाजी बेरे, सचिव आदेश सुतार, महिला आघाडी प्रमुख सौ. किरण काप व श्री. अली सर यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी शिक्षकांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.”समाजाची जडणघडण करण्यात शिक्षकांचे योगदान सर्वात मोठे आहे. तुमच्या प्रत्येक न्याय्य हक्कासाठी आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर राहील, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर माजी राज्यसभा खा श्री. धैर्यशील पाटील यांनी शिक्षकांच्या राष्ट्र उभारणीतील कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. “शिक्षकांचे प्रश्न सोडवणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षण संघटनेने घेतलेला हा उपक्रम शिक्षकांचा हुरूप वाढवणारा आणि त्यांच्या कष्टाला न्याय देणारा आहे.” राज्यातील ज्या शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे त्यांचा उल्लेखही करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!