Uncategorized
Trending

*डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी रक्तदान करणाऱ्या १०६ रक्तदात्यांना फळांचे वाटप*

*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम*

*डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी रक्तदान करणाऱ्या १०६ रक्तदात्यांना फळांचे वाटप*

*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम*

लातूर : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त डॉ अण्णाभाऊ साठे चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्व रक्तदात्यांना पत्रकार संघाच्या वतीने फळाचे वाटप करण्यात आले. रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णाला जीवनदान देण्याचे महान कार्य आहे. याच सामाजिक भावनेतून डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या १०६ रक्तदात्यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर जिल्हा शाखेच्या वतीने फळांचे वाटप करून त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. पत्रकार संघाच्या या उपक्रमातून रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच समाजात रक्तदानाविषयी जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त संजीवनी ब्लड बँक, लातूर ब्लड बँक, शासकीय रक्तपेढी तसेच ब्लड कंपोनंट सेंटर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या नागरिकांनी पुढाकार घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा शाखेने १०६ रक्तदात्यांना फळांचे वाटप केले. रक्तदात्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. रक्तदानाबाबत समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे आणि अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, या उद्देशाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे उपस्थित होत्या. यावेळी संघाचे जिल्हा सचिव दिनेश गिरी, जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव देडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, पत्रकार भुजंग कांबळे, पत्रकार डॉ.सितम सोनवणे, पत्रकार संगप्पा स्वामी, पत्रकार मारुती काळे, पत्रकार आनंद दणके यांच्यासह संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रक्तदाते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!