Welcome to Police News Network 24x7   Click to listen highlighted text! Welcome to Police News Network 24x7
E-Paper
Trending

विक्रोळीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य आयोजन; मा. श्री.आमदार सुनील राऊत आणि संपादक श्री.अतुल जाधव यांचा विशेष सत्कार संपन्न

​विक्रोळीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य आयोजन; मा. श्री.आमदार सुनील राऊत आणि संपादक श्री.अतुल जाधव यांचा विशेष सत्कार संपन्न

​विक्रोळीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य आयोजन; मा. श्री.आमदार सुनील राऊत आणि संपादक श्री.अतुल जाधव यांचा विशेष सत्कार संपन्न
​मुंबई (विक्रोळी):
विक्रोळी येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात, ‘जय हनुमान मित्र मंडळ अँड वेल्फेअर ट्रस्ट’च्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ‘श्री रामचरित मानस अखंड पाठ’ आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या भक्तिमय वातावरणात आज स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा विशेष सत्कार सोहळा पार पडला.
​या कार्यक्रमाचे निमंत्रक मा. श्री राधेश्यामजी रामजीलाल शर्मा (टिनीभाई) यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून विक्रोळी विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार श्री सुनील राऊत हे उपस्थित होते. त्यांच्यासह ‘विक्रोळी वृत्तांत’चे संस्थापक संपादक आणि ‘चक्रीय भारत’ वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक श्री. अतुल जाधव यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
​कार्यक्रमाचे निमंत्रक श्री राधेश्यामजी शर्मा यांच्या हस्ते आमदार श्री सुनील राऊत आणि संपादक श्री. अतुल जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन व शाल अर्पण करून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आपल्या क्षेत्रातील समाजकार्याबद्दल आणि पत्रकारितेतील योगदानाबद्दल या दोन्ही मान्यवरांचे कौतुक करण्यात आले.
​या वेळी परिसरातील नागरिक, भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमान जन्मोत्सवाच्या पवित्र मुहूर्तावर झालेल्या या सत्कार सोहळ्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!