Welcome to Police News Network 24x7   Click to listen highlighted text! Welcome to Police News Network 24x7
Uncategorized
Trending

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विक्रोळी टागोर नगर कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा.

मुंबई ( प्रतिनिधी) विक्रोळी टागोर नगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यालय प्रमुख संजना कोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झेंडावंदन कार्यक्रम तसेच लहान मुलांना स्टेशनरी व लाडू वाटप व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे, एडवोकेट निखिल सोनवणे, व सोनवणे मॅडम , सिव्हिल डिपेंनचे सीनियर सेक्रेटरी जयनिल लोंढे, विश्वकर्मा पुरस्कार प्राप्त गोदरेजचे रवी देशमुख ज्येष्ठ समाजसेविका व वनिता फाउंडेशनच्या अध्यक्षा वनिता प्रभाकर कांबळे, मिलिंद सेवा संस्थेच्या कविता निकाळजे एनजीओ प्रमुख पल्लवी मालवणकर आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो च्या घोषणा देत ध्वज फडकविण्यात आला .
सर्व नागरिकांना जेव्हा समानतेचा हक्क मिळेल त्यातच प्रजासत्ताक दिनाची सार्थकता आहे उत्तम शिक्षण आणि उत्कृष्ट उपचार हा केवळ श्रीमंताचा नव्हे तर सर्वसामान्यांचा ही मौलिक हक्क आहे. आरोग्य आणि शिक्षण हे मजबूत देशाचा पाया आहे या प्रजासत्ताक दिनी शिक्षित आणि आरोग्यपूर्ण भारत बनविण्याचा संकल्प करूया असे कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवरानी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले .
कामगार कल्याण मंडळाच्या केंद्र महिला कल्याण सहायिका संजना कोळकर मॅडम यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख मान्यवरानी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालक वर्ग ,शिशु मंदिर ची मुले शिवण क्लास केंद्र सभासद महिला आदींना मार्गदर्शन केले. तसेच शिशु मंदिर च्या मुलांना स्टेशनरी व लाडू वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून महिला वर्गाचा हळदी कुंकू समारंभ ही पार पडला असून कार्यक्रमाला शिशूमंदिर ची मुले , मुली व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र गायकवाड ,स्वाती चंदने व शिवण क्लास मधील महिला सभासदांनी विशेष परिश्रम घेतले असून शेवटी सर्वांचे आभार संजना कोळकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!