Welcome to Police News Network 24x7   Click to listen highlighted text! Welcome to Police News Network 24x7
महाराष्ट्र
Trending

अनोळखी धमक्या आणि प्रशासनाची उदासीनता

अनोळखी धमक्या आणि प्रशासनाची उदासीनता

अनोळखी धमक्या आणि प्रशासनाची उदासीनता: अरक ग्रामपंचायतीच्या शाळेवरील अतिक्रमण कायम, जीवाला धोका!वाशीम, २१ जानेवारी २०२६: जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर प्रशासनाची पूर्ण उदासीनता! गेल्या वर्षीभरात कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांच्या रागाची पेटापेट सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अतिक्रमणकारकांकडून खुनाच्या धमक्या आणि गंभीर गुन्ह्यांचा प्रत्यक्ष धोका असल्याचा गंभीर आरोप अरक ग्रामपंचायतीतील एका नागरिकाने केला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी, तहसीलदारांसह अनेक अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे.दिनांक ०४/०६/२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम येथून ग्रामपंचायत अरक येथील जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत मा. तहसीलदार, मंगरूळपीर यांना त्वरित व नियमानुसार कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. या आदेशाची प्रतदेखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र, आज एक वर्ष उलटून गेल्यानंतरही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी अर्जदाराने स्वतः तहसीलदार व बी. डी. ओ. यांना चौकशी केली असता, त्यांनी मतदानाचे कारण सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे प्रशासनाची उदासीनता आणि जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न स्पष्टपणे उघडा पडला आहे.जीवाला गंभीर धोका!
अतिक्रमण करणाऱ्या काही व्यक्तींनी यापूर्वीच अर्जदाराविरुद्ध कटकारस्थान रचले आहे. त्यांच्यावर हल्ला करणे, खोट्या गुन्ह्यात अडकवणे, खुनाची धमकी देणे, विनयभंग किंवा बलात्कारासारखे गंभीर गुन्हे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. असे प्रकार यापुढेही होऊ शकतात, असा प्रत्यक्ष धोका आहे. म्हणून, अर्जदाराने नमूद केले आहे की, त्यांच्या जीवाला काही अनर्थ झाल्यास अतिक्रमण करणारे संबंधित नागरिक, ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, शाळा समिती अध्यक्ष, ग्रामसेवक, तहसीलदार, बी.डी.ओ., जिल्हाधिकारी, गटशिक्षण अधिकारी (पंचायत समिती मंगरूळपीर), शिक्षण विभाग प्राथमिक (जिल्हा परिषद वाशीम), शालेय शिक्षण मंत्री (मंत्रालय, कॅबिनेट सचिवालय, मुंबई), मुख्य कार्यकारी अधिकारी (वाशीम) आणि इतर संबंधित अधिकारी जबाबदार राहतील.जनतेची एकमुखी मागणी
ग्रामस्थांच्या व्यापक मागणीनुसार, अतिक्रमण हटवून त्या जागेवर मुलांसाठी मैदान किंवा गार्डन बांधावे किंवा श्री गजानन महाराज मंदिराचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे. या प्रकरणाने गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष वाढला आहे.अर्जदाराची विनंती
१. जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत तात्काळ व नियमानुसार कारवाई करावी.
२. केलेल्या कारवाईची प्रत अर्जदाराला कळवावी व एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.
३. अर्जदार गावी परतल्यावर त्यांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात.या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कारवाई व्हावी, अन्यथा ग्रामस्थ मोठा आंदोलनाचा इशारा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!